थोडसं मनातल
थोडसं मनातल
1 min
58
थोडसं मनातल
मनातल्या कोपऱ्यातल
मनाला भावलेल
मनात नेहमी घर करून राहिलेल
कधी अलगद येवुन
मनाला आनंदित करणार
कधी नकळतपणे
मनाला दुःख देणार
नकळतपणे दिलेल दुःख
स्वतःच दूर करणार
डोळ्यातील अश्रू
अलगदपणे पुसणार
सुख दुःखात सदैव
सोबती राहणार
एकदा पकडलेला हाथ
कधीच न सोडणार
अस हे मैत्रीच नात
नेहमी मनाला भावणार
