संसार
संसार
"आयुष्यात तस काही,
करायला उरलेलं नाही.
तु म्हणते निवांत झाल्यावर बोलू पण,
निवांत व्हायला आता मला वेळ नाही. "
गुंतुंनी गुंत्यात साऱ्या,
विरक्त मन होईल का,
असुनी सर्वात मी परी
एकटी तरीही उरेन का,
नजरेतील कोमलताही,
आग ओकते सूर्यावरी
रोजचाच स्वभाव तरी
रवीलाही दाह सोसवेना
आजची रात्र नाही,
जन्माची आंधळी ही प्रीती
माया माझी समजायला
पाखरं राहतील न माझ्यापाशी
आईच्या काळजाला असा काही
घाव घालतो अहंकारी..
एकटं पडायची भीती
वाटते खरी मना ,
मनाला कंठ जरी ,
पाचर त्यास घातली मी
गुंतुंनी गुंत्यात साऱ्या,
एकटी तरीही का उरेन मी..

