संकल्प गीत...!
संकल्प गीत...!
भारतभूच्या नवं युवकांनो
नवे गीत हे गाऊ चला
नवे गीत हे गाऊ चला, गाऊ चला।।धृ।।
रान पिकले विज्ञानाचे
उज्वल उन्नत जोमाने
कापणी त्याची करू चला...।।१।।
विज्ञानाचे पंख पसरता
आवकाशात मन झेपावले
मंगळ वारीचे त्या कौतुक करू चला ...।।२।।
जात पात सारे विसरून
श्रमाचे डोंगर पार करुनी
एकदिलाने प्रगती करू चला....।।३।।
बंधुभाव अन सहिष्णुतेची
मशाल चेतवूनी मनोमनी
तिरंगा देशाचा उंच फडकवू चला..।।४।।
सृजनशीलतेचे हे
गीत गावूनी आनंदाने
देश किर्तीमान करू चला ..।।५।।
भारतभूच्या नवं युवकांनो
नवे गीत हे गाऊ चला
नवे गीत हे गाऊ चला, गाऊ चला।।धृ।।
