संगत
संगत
संगत फार महत्वाची गोष्ट,तुम्ही कोणाच्या सानिध्यात,
यावर भविष्य अवलंबून,संगतीवर यशापयश जोखतात...
योग्य संगत माणसाला घडवते,संगतीचा प्रभाव पडतो,
चुकीच्या कृतीचा प्रभाव,अयोग्य संगतीने माणूस बिघडतो..
संगत असते सामर्थ्यवान, सकारात्मक माणसं सोबतीला,
सर्वोत्तम माणसाच्या सहवासाने,झळाळी येते व्यक्तित्वाला
तुम्ही कुणाची निवड करता,यावर तुमचं ठरतं यश-अपयश,
चुका होऊ नये म्हणून रहा दक्ष,याच मार्गाने मिळते सुयश...
