#समझोता
#समझोता
पाहिली होती मनात
खूप स्वप्न मोठी मोठी
मिळावा असा जोडीदार
मला समजून घेण्यासाठी
असेल तो मित्रासारखा
करीन मन मोकळे
मला पडलेले प्रश्न
सोडविण हळूहळू सगळे
घुसवटलेल्या मला म्हणेल
जाऊ दूर निसर्गात
प्रत्येक पावलासोबत असेल
त्याचा हातामध्ये हात
प्रत्येक ठिकाणी नेहमीच
मी का करावा समझोता
थोडेतरी आनंदाचे क्षण
त्याने द्यावेत आता
नाही कुणाला माहीत
आयुष्य हे कितीसं
उत्साहित मनाला कायम
नसावं उत्तर ना च
माझ्या कर्तर्व्यांचीच फक्त
प्रश्नपत्रिका ती नसावी
भावना समजून घेण्याइतपत
वेळ त्याने द्यावी
प्रा. सौ.नलिनी लावरे

