STORYMIRROR

Sarita Kaldhone

Classics

3  

Sarita Kaldhone

Classics

स्कंदमाता

स्कंदमाता

1 min
407

दुर्गेचे पाचवे रूप

नाव तुझे स्कंदमाता

महिमा अगाध तुझा

तू विश्वाची त्राता....


आहे चार भुजाधारी

हाती कमळाचे फूल

श्वेत धवल रंग अंगी

कानी शोभते डुल...


स्कंद बसती अंकी

कमळाच्या आसनी विराजमान

वाहन असे सिंह तव

मूर्ती साजिरी घाली पद्मासन...


भक्त चक्रात स्थिर होई

साधका मिळे मुक्ती

आई तुझ्या मायेची 

अफाट आहे शक्ती....


अलौकिक तेज लाभे

मोक्षाचा मार्ग होई सुलभ

चिंता हरून जातील साऱ्या

दूर होईल मनातील मळभ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics