सजले मी
सजले मी
इष्काच्या या रंगमहाली..
रात ही फुलून आली....
लाज आली गाली, ओठांवर चढं ही लाली
तुम्हा साठीच मी साजशृंगाराने सजली llधृll
दर्वळे चंदनाचा सुगंध
बांधला मी तंग कटीबंध
चढलिया अशी राया धुंद
चोळी काच अंगी झाली तंग
राया मी इंद्राची अप्सरा ही .
अवतरली..
तुम्हासाठीच मी साजशृंगाराने सजली..ll१ll
शालू नेसला केशरी रंग
दागिन्यांत मढे माझे अंग
याव बसावं खेटून संग
होऊ आज प्रीतीत हो दंग
काया माझी अशी तुम्हासाठीच झिजली
तुम्हासाठीच मी साजशृंगाराने
सजली..ll२ll

