सिद्धिदात्री देवी
सिद्धिदात्री देवी
नवरात्रीच्या नवमीला नववे स्वरूप देवी सिद्धिदात्री
कमळावर विराजमान देवी सर्व सिद्धींची अधिष्ठात्री.
चतुर्भुज देवी कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र हातात
सिद्धिदात्रीला सरस्वती देवीचेही एक रुप मानले जातात.
सिद्धिदात्री देवीची षोडशोपचार पूजा करावी भक्तीभावे
नवाहन,नवरसयुक्त नैवेद्य ,तसेच नऊ प्रकारची फुले अर्पावे.
देवीच्या पूजनाने महाविद्या व अष्टसिद्धीची प्राप्ती होते
मनोभावे पूजनाने भक्तांच्या मनोकामना देवी पूर्ण करते.
मोरपंखी रंग यानी हिरव्याची संपन्नता,निळ्याची स्थैर्यता
लाभते निष्ठा,आत्मविश्वास,सचोटी,सृजनता,आरोग्यसंपन्नता.
