STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

श्रमेव् जयते

श्रमेव् जयते

1 min
211

लक्ष्मीदेवी श्रमानेच होत असते प्राप्त!

यशोदेवतादेखील श्रमदेवीचीच आप्त!!


परिश्रमाशिवाय जगी मिळत नसते काही!

उद्योगी व्यक्तीलाही काहीच अशक्य नाही!!


एवढीशी मुंगी पण सदैव राही कार्यरत!

वारूळांत ती अन्नाचा संचय राही करत!!


वाळूचे कण रगडीता प्रयत्ने तेलही गळे!

परिश्रमी व्यक्तीसच मेहनतीचे फळ मिळे!!


श्रमाचे महत्व खरोखरच आहे अपरंपार!

मेहनतीशिवाय व्यर्थच जाते सारे बेकार!!


अनमोल धनदौ़लत हवीच असेल जर!

दुर्दैवाचे पहाड ते करावे लागतात सर!!


मातीतून सोन्यासारखी उगवाया रास!

उन्हातान्हात राबावे लागे शेतकऱ्यास!!


लाटांवरच होऊन स्वार दर्या होतो पार!

श्रमाने सारे शक्य स्वप्नही होती साकार!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational