श्रेष्ठ कोण?
श्रेष्ठ कोण?
श्रेष्ठ कोण?
सौंदर्य की बुद्धिमत्ता
राजा होता एक, न्यायप्रिय एका नगरीत
ऐश्वर्यसंपन्न, बुद्धिमान अन् मोठा निष्ठावंत I
साथ होती बुद्धिचातुर्याची सोबत
अन् जिंकले होते त्याने अनेक शत्रूही मोठ्या युद्धात I
राजाजवळ होता उणेपणा कुरुपतेचा एकच,
अभाव सुस्वरूपतेचा, हे कारण त्याला राहिलं कायम सलतच I
आली नर्तिका एकदा नृत्य करण्या राजदरबारी
आज्ञा होताच ती आपले नृत्य गर्वाने सादर करी I
गर्व होता अतिसौंदर्याचा तिला नृत्यकलेबरोबर
ताठा सौंदर्याचा अन् अहंभाव कायम सोबत त्या बरोबर I
नृत्याचा बहारदार कार्यक्रम दरबारी सादर झाला
मंत्रमुग्ध प्रजा अन् राजा नृत्य पाहून खूप आनंदी झाला I
संपलं नृत्य, मिळाली खूप मोठी बिदागी नृत्यांगनेला
सोने, चांदी, माणिक, मोती अन् सोबत द्रव्य होत साथीला I
नृत्यांगना गर्वाने विचारी भरदरबारी राजाला
विचारते एकच प्रश्न, राग न धरता मनी त्याचे I
प्रदान करीत होता ब्रह्मदेव सौंदर्या जेव्हा
राजेसाहेब आपण सांगा ना कुठे उभे होता तेव्हा?
वदला राजा नृत्यांगनेला चतुरपणे -
तू सौंदर्य मिळविण्याच्याच रांगेत उभी होतीस जेव्हा
बुद्धिमत्ता मिळविण्याचा रांगेत उभा होतो मी तेव्हा I
म्हणूनच मी तुझ्यासारख्या अनेकांना नाचवतो हवे तेव्हा हवे तसे
झाली निरुत्तर नृत्यांगना ऐकून सडेतोड उत्तर राजाचे
कळून चुकले सरतेशेवटी सौंदर्यापेक्षा बुद्धिमता केव्हाही श्रेष्ठच असते I