STORYMIRROR

Abha Valavalkar

Others

3  

Abha Valavalkar

Others

नको अक्षता वाहूया मंगलप्रसंगी

नको अक्षता वाहूया मंगलप्रसंगी

1 min
491

नको अक्षता वाहूया मंगलप्रसंगी

फुले -फुलकाळ्यांचा वर्षाव करूया मंगलदिनी


एक उत्तम उपाय सुचला मला पहा-ना

लग्न मुंज मंगलकार्यात वापरू फुले आणि त्यांच्या पाकळ्याना...........१


पुरोहिताने मंगलकार्यात शुभ मंगल सावधान म्हटल्यावर

आप्तेष्ट-नातेवाईक करतात अक्षतांचा वर्षाव संभाव्य व्यक्तीवर ..........२


लग्न-घटिका-मुहूर्त समिप येतांच भटजीची मंत्रोच्चार मोठ्याने

मंडपात उपस्थित वर्षाव करतात अक्षतांचा जोराने..........................३


हातात माईक ,आवाज भारदस्त मन्त्रोचार अन मंगलाष्टके न्यारी 

चढाओढ लागते मुहूर्ताच्या अंतापर्यंत कोण मोठे अन कोण भारी,

उपस्थितांना हवे असते यथे मिष्टान्न भोजन यथेच्छ अशा वेळी............४


मंत्रोचाराचे वेळी सावधान म्हटल्यावर वर्षाव अक्षतांचा 

पडतात फक्त दहा टक्केच डोक्यावर संभाव्य व्यक्तींचा

खूप आगळीक आस्था आणि जवळीक असणाऱ्यांकडूनच व्यक्तींच्या.....५



मंगलकार्यात सत्तर टक्के अक्षता दुरूनच इतरांच्या अंगावर टाकल्या जातात

अन वीस टक्के अक्षता तर मुद्दाम चक्क ताप देण्यासाठी राग-द्वेष वैमनस्य

चेष्टा म्हणून शिडकावा करतात

काही जण तर उपस्थितांवर अक्षता फेकून मारत विकृत आनंद मिळवतात........६


शुभ मुहूर्त सावधान म्हटल्यावर टाकतात अक्षता आप्तेष्ट

पडतात अक्षता अति अल्प वधू वर -मुंजावर जे टाकतात ठेवून भावना स्पष्ट .....७


मुहूर्त आटोपून उपस्थित पाहुणे डोक्यावर हात फिरवून स्वतःच्या -

टोपी-पागोटे तर बायका बॉबकट,गंगावन वेशभूषा झटकून डोक्यावरच्या

होतात मोकळे अक्षता झटकून हॉलमध्ये पसरवून अंगावरच्या.........................८


    

मंगल कार्यालयाच्या मंडपात क्षणार्धात कित्येक किलोचा पडतो सदा अक्षतांचा,

कुंकुम मिश्रित अक्षता (अख्खा तांदूळ) तुडवला जातो पायी पहा ना उपस्थितांच्या.........९


   

हीच जागा अक्षता ऐवजी जर फुलांनी-पाकळ्यांनी घेतली तर ?

 गालिचा अंथरला जाईल फुल-पाकळ्यांचा उपस्थितांसाठी मंडपभर.........................१०


Rate this content
Log in