पुण्य आणि एक पाप
पुण्य आणि एक पाप
युद्ध महाभारतचे संपल्यावर
श्रीकृष्ण त्याच्या स्वगृही परतल्यावर...................................1
पत्नी रुक्मिणी व कृष्ण यांच्यात वाद झाला
ज्यांनी युद्धात ठार मारले गुरु द्रोणाला
त्याचप्रमाणे भीष्म पितामहाला
तुम्ही कसे उभे राहता त्या मारेकरांच्या बाजूने सांगा नं मला? ...........2
कृष्ण म्हणे
गुरु द्रोणाचार्य व पितामह भीष्म हे दोघेही आदरणीय व्यक्ती,
आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या ह्या महान शक्ती
शंका यात कुणालाही नव्हती या दोन महान योध्यावरती..........3
पण एक पाप त्यांच्ज्या आयुष्यात घडलेच की,
अन त्यामुळे जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरलेच की..............4
रुक्मिणी म्हणे:
कृष्णा पाप कोणते? स्पष्ट करून सांगा ना मला जरा ?
त्यावर कृष्ण म्हणे तिला., सांगतो ते लक्ष देऊन एक जरा...........5
जेव्हा भर राजसरबारी वस्त्रहरण होत होते द्रौपदीचे,
उपस्थित होतेच की, हे दोन ज्येष्ठ -वरिष्ठ त्या दरबारातच
रोखू शकत होते वस्रहरणाचा हा प्रकार ज्येष्ठ व्यक्ती म्हणूनच
पण या दोघांनीही नाही केला हस्तक्षेप तेव्हा म्हणावे का जाणून बुजूनच...6
अन्याकारक कृत्याने तुमच्या एका
आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत द्यावी लागली नाही का?...7
शून्य होऊन जाते किंमत त्यामुळे क्षणात एका
सांग रुक्मिणी मी जे , सांगतो ते मनापासून पटते का?..........................8
