हाथ रे कर्मा राहिली 3 सत्कार्य
हाथ रे कर्मा राहिली 3 सत्कार्य
जेव्हा रावण रामाच्या बाणाने धारातीर्थी पडला
तेव्हा प्रभू रामचंद्रांनी आलिंगन दिले रावणाला
म्हणाला रावण प्रभू रामचंद्राला त्यावेळेला
कधीही तात्काळ सुरुवात करावी शुभ कार्याला
जर राहून गेले बाकी सत्कर्म करावयाचे
तर नाही येत संधी पुन्हा ते पूर्ण करावयाचे
सत्कार्ये करावयाची रावणाने ठरवली होती तीन
भूलोक सोडून स्वर्गवासी होण्यापूर्वी म्हणे पुरी करीन
लंकाधीशाने काम ठरवले होते पहिले
मार्ग नरकाचाच प्रथम बंद करायचे ठरवले
खारट पाणी समुद्रातले काढायचे दुसरे काम ठरले
संपूर्ण समुद्रच भरून टाकायचा दुधाने असे त्याने ठरवले
स्वर्ग प्रवेशासाठी शिडी बनवणे निश्चित केले काम तिसरे
पापी अन् पुण्यावानाला सरळ प्रवेश मिळेल स्वर्गात त्याने
इतकी चांगली कामे सोडली अर्धवट त्या रावणाने
जर केली असती जिकरीने अर्धवट कामे पूर्ण त्याने
अहो मग
पापी अन् पुण्यवान थेट पोहचले असते स्वर्गात
रावणाने स्वर्गापर्यंत तयार करावयाच्या त्या शिडीने
