शोध
शोध
शोध घेत आयुष्याचा मी जगले,
हरवले मी मला, तुझ्यासाठी
मी माझी न उरले;
गंधाळल्या कित्येक वाटा
नभही बेभान बरसले
आसवांचा पूर सरला
नवे गाव वसले
उगीच हुरहुर
तरी अजून ही का?
तुझी आठवण सारखी येते
येईल परतून ती वेळ अवेळी
होईल जगणे भरून ओंजळी
अन् शोध स्वप्नांचा,
अवचित
होईल का पूर्ण?
उत्तर याच कोड्याचे
शोधत मी आयुष्यभर
जगले..