झालर
झालर
1 min
319
जगण्याची झालर ओढून चालतो जो तो,
व्यापलेल्या अनेक प्रश्नासहीत चालतो जो तो,
परिघ संपत नाही केविलवाण्या जगण्याचे,
वाळू वरच्या रेषा सहज पुसल्या जात नाहीत,
लाटांचे ऊर भरुन येत नाहीत तोवर,
जगण्याची झालर ओढून चालतो जो तो,
थांब थांब म्हणत जगतो जो तो,
हिशोब वहीतले संपत नाही तोवर,
घुटमळ मनात स्वप्नांची संपत नाही तो वर,
जगण्याची झालर ओढून चालतो जो तो...
