STORYMIRROR

Vasudha Naik

Classics Others

3  

Vasudha Naik

Classics Others

शिवअभंग

शिवअभंग

1 min
193

भोळ्या शंकरा


नीलवर्णी शिव | निलकंठ झाला ||

भक्तांच्या सेवेला | निजदिन ||


आवड बेलाची | शंकराला आहे ||

भोळ्या भावे पाहे | भक्ताकडे ||


गळा घाली शिव | रूद्राक्षाच्या माळा ||

भस्मच कपाळा | नित्य असे||


त्रिशूल डमरू | आहे तव हाती ||

सोबत पार्वती | महादेवा ||


जटाधारी शिव | गंगा डोई आली ||

गंगा सामावली | डोईवरी ||


भोलेनाथा आले| तव भक्त दारी ||

तुमच्या पदरी | दर्शनास ||


समजून घ्यावे | मानव पामरा ||

हे शिवशंकरा | सर्वांनाच ||


ॐ नमः शिवाय नमः



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics