STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

शेवटचा निरोप तुझा!

शेवटचा निरोप तुझा!

1 min
390

मी काळीज दगडाचं केलं होतं,

तुला शेवटचा निरोप देताना!


छोटे मोठे निरोप तुला खूप दिले होते,

असंख्य भावनांची दाटी तेव्हां डोळे भरताना!


विधात्याची योजना करणार कशी अमान्य, 

मन धाय मोकलून संतप्त, तुला वजा करताना!


माझा रडका चेहरा, तुला नावडता ना,

खांदा ,आधार नशीबी नव्हता मला सांत्वना देताना!


हजारोने माणसं रमवलेली ,जमवलेली तू,

एकटं नाही वाटलं, गुपचुप निघून जाताना!


तुझ्या आधारावर उंबरा सोडला मी,

थबकलाही नाहीस एकटी सोडून जाताना!


मी तटस्थ, स्तब्ध ,मूक ,बधीर,पण खंबीर

तू कुठेतरी रडला असशील मला दुखी पाहताना !


नाथ तू,सर्वस्व ,आशा,आकांक्षा,सहचर,

विधाताही निर्दयी रे, मला अनाथ करताना!


तुला निरोप अन निरोप जात्या वर्षाला,

साश्रू नयन नव वर्षाची पहाट तुझ्याशिवाय पाहताना !


मी पिलांसाठी जिवंत, कारण पाहिलंय मी

तुला तुझं शरीर सोडून माझ्यात सामावताना !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance