शब्दसखा
शब्दसखा
हाती येता पुस्तक माझ्या,
मनाचे भाव त्याने हेरले…!
उघडताच पहिले पान,
स्वप्न विश्वात नेऊन सोडले…!!
शब्दांच्या दरवळात हरवून,
आठवणींचा सागर सापडला…!
प्रत्येक ओळीत जणू माझा,
गहिरा प्रतिबिंब उमटला…!!
कधी हास्याच्या लहरींनी,
कधी अश्रूंच्या साजाने…!
कथा-कवितेच्या ओंजळीत,
प्रवास हा माझा, मज सहज उमगला…!!
कधी वाटे लेखक माझा,
माझ्याच मनाचा एक कोपरा…!
कधी वाटे मीच त्याचा,
शब्दांत गुंफलेला एक शेरा…!!
शेवटी पुस्तक मिटताना,
हृदयात एक साद उमटली…!
"पुन्हा भेटूया शब्दसखा,
तुझ्याविना ही वाट विरळ झाली…!!
