STORYMIRROR

राहुल जाधव

Others

4.4  

राहुल जाधव

Others

बोलका अबोला

बोलका अबोला

1 min
41

न बोलावे की बोलणे मज येत नाही,

भेद हा न मला कळला, ना कळला तो कोणालाही...!

न बोलताही बोलून जातो मी 'माझे' अंतरंग,

परी ते कुणा न कळाले, हे कसे गूढ-रंग…!

मनात ठेवतो मी सागरभर गूढ-गोष्टी,

शब्द मात्र नुसते 'काठावरचे' शिंपले-मोती...!

आतून मी ओरडतो, शब्दांचे भास नसती,

कोणालाही न कळाले, त्या किंकाळ्या कशा असती…!

अपेक्षा होती कुणी तरी, फक्त कान देईल,

या गूढ-सागराची, थोडी तरी नोंद घेईल...!

परी सगळेच पाहती, केवळ हे बाह्यरूप,

आतल्या वादळाला, न मिळे कुणा स्वरूप...!

अव्यक्त राहणेच मग, ठरले माझ्या नियती

या शब्दांच्या सीमा, मीच आखल्या माझ्या मनी...!

तो शिंपल्यातला मोती, आता 'मीच' जपतो आहे,

हा 'बोलका अबोला' माझा, मीच फक्त जाणतो आहे…!

न उमगल्याचे दुःख आता, मीच सोडले वाटेवरती,

माझ्याच अबोल्याची झाली, आता नवी अनुभूती...!

जे नाही कळाले कुणास, ते माझेच होऊन राहो,

हा एकान्त माझा 'सागर', मीच त्याला जपून ठेवो...!

आणि म्हणूनच, हे जगा! नको विचारू मज काही,

सागर माझा, मौन माझं, याचं गूढ पण माझ्याच भाळी…!!!


Rate this content
Log in