STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Others

4  

sarika k Aiwale

Romance Others

शब्दास गंध

शब्दास गंध

1 min
208

गंध फुलांचा मनी उतरला

भाव मनीचा शब्दी रंगला

शब्दासंगे वेड्या मनाला

गंध प्रीतीचा सांगून गेला 

प्राजक्त बहरात गंधाळला

मोगरा ही आसक्त झाला

शब्दासंगे वेड्या मनाला

गंध प्रीतीचा भाळून गेला 

पानोपानी भाव उमटला

शब्दास गंध मातिचा आला

मृदगंधित भास वेड्या मनाला

श्रवाणी आभास देवुनी गेला


नभी मेघ दाटूनिया आला

संगे पाऊसधारा ओल्या

श्रावणीआस वेड्या मनाला

शब्दगंधात सरी न्हाल्या 

आसमनीची सांगे शब्दाला

भावमनीचा कोमल भावला

शब्दासंगे वेड्या मनाला

प्रीतीगंध शब्दात अत्तरला 

सांज अशी ती वेडावली

गंधित आस मनी जागली

शब्दास गंध येतो नभीचा

शब्दात कविताही गंधाळली 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance