STORYMIRROR

Krishna Shiwarkar

Tragedy

4  

Krishna Shiwarkar

Tragedy

शाळेतली हुशारी !

शाळेतली हुशारी !

1 min
399

शाळेतली हुशारी त्याची

शाळेत राहून गेली,

मागे बसणारी पोरं

कमाल करून गेली !


अव्वल नंबर विद्यार्थी

सर्व शिक्षकांचा लाडका,

खऱ्या खुऱ्या आयुष्यात

त्याचा वाडा पडका !


कोणी झाले शिक्षक

कोणी वकील, इंजिनिअर,

गाडी याची पळे ना

ऊरला रिव्हर्स गिअर !


मार्गदर्शन चुकीचे

यालाच कसे मिळाले ?

बाकी सर्व संकटातून

दुर कसे पळाले ?


बहुतेक असेल भावनिक

वा असेल थोडा हळवा,

रक्त पिण्या चिकटल्या

त्याला कर्तव्यांच्या जळवा !


ऐन ऊमेदीच्या काळात

आली प्रपंचाची जबाबदारी,

स्वप्नांच्या मागे धावले 

तर खायचे काय घरी ?


कॉलेजच्या नायीकांमधला

लाडका चॉकलेट हिरो,

आता बसला माती चिवडत

पगारातही कमी झिरो !


आमदार, खासदारांनी

केला त्याचा सत्कार,

पण यश आणि प्रयत्नात

घडला नाही चमत्कार !


अख्खा गाव म्हणायचा हा

शिक्षक होणार नक्की,

याच्यासाठी आपण सारे

शाळा बांधू पक्की !


शाळा झाली बांधून पण

तो शिक्षक नाही गवसला,

पस्तीस टक्केवाला भाऊ

फळा पुसत दिसला !


नुसती शाळेतली हुशारी,

येत नसते कामात,

ज्याला जग समजले

तोच असतो जोमात !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy