STORYMIRROR

Krishna Shiwarkar

Others

4  

Krishna Shiwarkar

Others

परत एकदा नव्याने

परत एकदा नव्याने

1 min
587

परत एकदा नव्याने

कवी व्हावेसे वाटते,

पण जुन्या प्रसंगाने

हृदय माझे फाटते!


साहित्याच्या दुनियेमध्ये

नाव मोठे कमावले,

पण सांसारिक शर्तीमध्ये

सारे अस्तित्वच गमावले!


शेकडो काव्यरचना

हातून माझ्या घडल्या,

भलत्याच संशयाने 'तिने'

होत्या, नव्हत्या फाडल्या!


रसिक प्रश्न पडतील बहू

नेमके त्यात काय असावे?

ज्यासाठी घरचीने त्याचे

वाड्मय विश्वच पुसावे!


प्रेम, समाज, आयुष्य

आणखी काय असणार,

पण मात्र बायकांना त्यात

जुनी लफडीच दिसणार!


यापलीकडेही जग असते

त्यांना कसे कळणार?

नष्ट झालेले कवी मन

परत कसे जुळणार?


दहा वर्षे लोटलीत

पेन हाती नाही धरला,

गुमान काम करतो आणि

जातो आपल्या घरला!


मला येऊन चिडवतात

फिनिक्स आणि गरूड,

उचल तुझी लेखणी आणि

हो साहित्यावर आरूढ!


परत एकदा नव्याने

करून पाहावा गुन्हा,

कारण असा मानवी जन्म

भेटणे नव्हे पुन्हा!


Rate this content
Log in