STORYMIRROR

Krishna Shiwarkar

Others

3  

Krishna Shiwarkar

Others

अपेक्षांच्या प्रतिक्षेत

अपेक्षांच्या प्रतिक्षेत

1 min
336

काय होती अपेक्षा

आणि काय घडले,

साधे सरळ जगणे

मलाच महाग पडले !


कपट असते मनात

तर बरे झाले असते,

उपकार करून नात्यांवर

हाल झाले नसते !


ज्यांचे केले भले 

त्यांनिच साथ सोडली,

चादर माझ्या स्वप्नांची

टरा टरा फाडली !


उंच शिखर गाठूनिया

मलाच वाकुल्या दावती,

बचाव का करताेस

म्हणून अंगावरही धावती !


मरण्याआधिच रोज

छळून मरतो आहे,

काही क्षण जगू द्यावे

पाय धरतो आहे !


बुध्दिमत्ता बलवत्तर

तरी हसल्या हस्तरेषा,

जगणे आले लाचारीचे

झाली मलिन दशा !


आता माझ्या श्वासांना

उरला नाही अर्थ,

परोपकार व परमार्थ

गेले सगळे व्यर्थ !


आज नाही तर उद्या

नक्कीच मिळेल फळ,

अपेक्षांच्या प्रतिक्षेत

सुरूच आहे छळ !


Rate this content
Log in