STORYMIRROR

Anil Chandak

Classics

3  

Anil Chandak

Classics

शाळेतले दिवस

शाळेतले दिवस

1 min
527


शाळेतल्या दिवसांची सारी गंम्मत वेगळी

वह्या पुस्तके दप्तरे,ओझी आमची आगळी!!1


होते गुरूजी पंतोजी, चष्मा डोळ्यांवरी त्यांचा!

जाड भिंगातूनी पाही, घेती अभ्यास तो साचा!!2


काळ्या फळ्यावर जेव्हां, लिही अक्षरे पांढरी!

पाठ त्यांची वळताची ,मुले हसायची सारी!!3


होता मधली ती सुट्टी, आम्हीं खेळ खेळायचे!

मातीमध्ये कपडे नी, हातपाय मळायचे!!4


गोट्या खेळण्याची मजा, होती आगळी वेगळी!

ढाय ज्याने मारली की, जिंकी तो गोट्या सगळी!!5


चिंचा दगडे मारूनी, खात होतो आवडीने!

बोरे आवळे खिशात, सगळ्यांच्या सोबतीने!!6


अप्पाधप्पी लिंगोरच्या, खेळ होते मजेदार!

कब्बड्डीच्या खेळामुळे, अंग दुखायचे फार!!7


मारामाऱ्या खोड्या केल्या, त्याची गणतीच नाही!

गुरूजींची छडी सदा, आम्हां हातावरी राही!!8


शाळेतल्या जीवनाला, आम्ही आज आठवतो!

येता आठवणी क्षण, पुन्हा भुतकाळी जातो!!9


बालपण दे रे देवा, आम्हां परत एकदा!

खोड्या जर केल्या तर, शिक्षा कोंबड्याची सदा!!10



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics