।। शाळा सदगुरूंची ।।
।। शाळा सदगुरूंची ।।
गुरू मंत्राच्या जोरावर सहल करू भवसागरांची ,
चला दासांनो आज पाहुया शाळा सद्गुरू बैठकीची ।। धृ ।।
शाळेत जमले दास सारे बैठकीच्या वर्गात ,
फिटते पारणे डोळ्यांचे सद्गुरूंचे दर्शन होतं,
हसुनी घेती राव रंक शिकवण मोक्षाच्या प्राप्तीची ।।१।।
श्रवणासाठी येती दास नाना स्वारींच्या वर्गात ,
कष्ट सोसले समर्थांनी प्रतिष्ठान उभे करण्यात ,
समर्थ कृपेने आज्ञा आम्हा मंगलाचरणाची ।।२।।
लहानांपासून थोरांपर्यंत एकच वर्ग बैठकीचा ,
एकच गुरुजी भेद न करती समर्थ बोधांचा ,
फी न घेती सद्गुरू आमचे चिंता नसे संसाराची ।।३।।
बैठकीची वेळ एकच ना कुणा सजा नसे ,
राग न कधी सद्गुरूंना वर्गाबाहेर कुणी नसे
समर्थ चरणी प्रार्थना दासांची कोरोना नष्ट करण्याची ।।४।।
उपासनेच्या बळावरती अपराध घेती पोटांत ,
दास विनवतो शरण येऊनी अखंड ठेवा चरणांत ,
असे मिळाया सद्गुरू आम्हा कृपा त्या देवाची ,
ओढ लागली दासांना श्रवणाच्या बैठकीची ।।५।।
