STORYMIRROR

RANI SAKHARE

Inspirational Others

3  

RANI SAKHARE

Inspirational Others

श्रावणा

श्रावणा

2 mins
336

श्रावणा.! किती पहावी तुझी वाटं ,

येतो वर्षातून एकदा , आला का रे आमचा वीट ,

       सांग कधी होणार भेटं ||१||


श्रावणा ...! व्हावी का तुझ्या मातीतीलं धुळं ,

तुझ्यापासून वेगळं राहण्याची आणू नको बघ वेळं ||२||


श्रावणा...! करते तुझ्या आगमनाची आरास,

नटली वसुंधरा पांघरली शाल ,

तुला पाहण्याची लागली बघं आस ||३||


श्रावणा...! फुलावं का तुझं फुलं ,

मृगनक्षत्र निघताचं लागते बघ तुझी चाहूल ||४||


ये श्रावणा...! दे की रे ,तुझा आसरा थोडा, 

श्रावणा ! मी शेतकरी तुझा भोळा आणि भाबडा ||५||


श्रावणा ! पाढं की रे तुझी सरी वर सर, 

नदी नाल्यांना येऊ दे पूर,

तुझ्या न येण्यानं वाटे बघं हुरहूर ||६||


श्रावणा...! तू ये रे सारखां थोडा - थोडा ,

नाही फुलली पृथ्वी, नाही नटली झाडे वेली , 

तुझ्यासाठी माणूस झाला की रे वेडां ||७||


श्रावणा ! व्हावं का तुझ्या मातीतलं खडं, 

श्रावणा ! तू साऱ्या मानवजातीला लावलं बघं याडं ||८||


श्रावणा ! होऊ का तुझ्या झाडाची फांदी , 

नाही बरसला की , वाटतं नाही बघ आनंदी ||९||


श्रावणा...! व्हावं का तुझ्या स्वरूपाचं मूळं,

चरणी ठेवुनी माथा , डोकावूनी वर पाहता,

तुझं रूप दिसावं आगळं -वेगळं || १०||


श्रावणा...! तुझ्या येण्यानं धरती माता घालेल हिऱ्या ,

मोत्यांचा हार , तुझे संवर्धन करून, श्रावणा...!

करीन तुझाच जयजयकार ||११||


श्रावणा! तुझ्या आगमनाने आली सणांची रेलचेल ,

 निसर्ग राजा आकाशी राहिला , 

साऱ्यांनी श्रावणा! तुला डोळे भरून पाहिला ||१२|| 


श्रावणा ! व्हावी का ? तुझ्या अंगाखाद्यावरची पानं फुलं ,

श्रावणा ये श्रावणा , कितींदा द्यावे तुला आलिंगन ||१३||


श्रावणा ! येऊ दे तुझे पानं फुलं झाडं फळां, 

बारा महिन्यात थोर , श्रावणा महिना आगळां ||१४||


ये श्रावणा ! माणसाला लावू नको तू बुक्का ,

कान धरून मागीन क्षमा, श्रावणा !

चरण सेवेचा दे की रे मोका || १५|| 


श्रावणा ! असा कसा रे तू सैराट , वर्षा मागून वर्षे 

लोटली , तुझी किती बघू वाटं ||१६||


श्रावणा ! होऊ का तुझ्या झाडांचा तुरा , डोळ्यातून वाहे

चंद्रभागा , बळीराजा झाला की रे सैरा भैरा ||१७||


श्रावणा ! व्हावी का तुझ्या पाण्याची फुलवातं ,

तुझं अन् मानवाचं जन्मोजन्मीचं कि रे नातं ||१८||


श्रावणा ! करते तुझी मनोभावे पंचारती ,

ये श्रावणा ! पंच महाभूतामध्ये तुझीचं रे कीर्ती ||१९||


श्रावणा! तुझ्या आगमनासाठी करते पंचपक्वानांचे ताट,

तुझ्या येण्याची मी आतुरतेने ,डोळे लावून पहाते वाटं ||२०||


श्रावणा ! सर्वांना लावतो तू वेडं,

लवकर जरा वेळ काढं,

तुझ्या पाण्याने कोरोनाला धुऊन काढं, अन

जिकडून आला तिकडेच धाडं, नाहीतर त्याला मातीत गाढं , ||२१||


श्रावणा !तुझा जपेन मी वारसा, पाणावले 

डोळे विचारू कुणा, तू दिसतो कसा, लायन्स क्लब

चा आम्ही पुढे चालवू वसा ||२२|| 


ये श्रावणा !देवाचेचं तुझे रूपं ,

तुझ्यासाठी सारं बनलो , राहीलं का काही , 

का गं रुसली धरणीआई || २३ ||


श्रावणा ! ये बा श्रावणा !होऊ दे तुझ्या ऋणातून उतराई ,एवढी शिक्षा बरी नाही ,

तुझ्या लेकराला कुशीत घे आई, साऱ्या जगाला तूच आधार देई,

स्टोरी मिररला उंच शिखरावर नेई,

माझी श्रावणाई ! माझी श्रावणाई ! माझी श्रावणाई ! ||२४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational