सदगुरूची वाट
सदगुरूची वाट
चांदणं चांदणं झाली रात
दास पाहतो सद्गुरुची वाट ।।धृ।।
दासांना साऱ्या बोलवा गं
श्रवणाचा लाभ घडवा गं
स्मरणाचा भरूनी मळवटं
दास पाहतो बैठकीची वाट ।।१।।
उपासनेची कास धरा गं
अखंड नामस्मरण करा गं
मंगलाचरणात रहावा नीट
दास पाहतो सद्गुरुची वाट ।।२।।
रेवदंडयाचा सदगुरु बोलवा गं
समर्थांचे कार्य वाढवा गं
भक्ती गं भक्तीची धरुनी वाट
दास पाहतो बैठकीची वाट ।।३।।
आरोग्य शिबीर भरवा गं
वृक्षारोपण करा गं
सद्गुरुचा सांगू मी काय थाटं
दास पाहतो सदगुरुची वाट ।।४।।
स्वच्छता मनी धरा गं
भवसागर पार करा गं
तुळशी गं पत्राचं घेऊन ताट
कोरोनाची हो सदगुरु लावा वाट ।।५।।।
चांदणं चांदणं झाली रात
दास पाहतो आप्पा स्वारीची वाट ।।धृ।।।
