STORYMIRROR

RANI SAKHARE

Others

3  

RANI SAKHARE

Others

।। जय सदगुरु ।।

।। जय सदगुरु ।।

2 mins
1.8K

जय सदगुरु , जय सदगुरु

सदगुरु आज्ञेचेच करू

कपाळी स्मरणाचा गंध

सदगुरू तुझा मला छंद

वेडी झाले वेडी झाली

सदगुरूच्या गावा गेली

तुटली सगळी नाती गोती

सदगुरूच माझ्या जीवनाचा साथी

सदगुरू माझा आला कोटात

म्हणून संसार माझा झाला थाटात

सदगुरू तुझ्या मूर्तीवणी जगात मूर्ती नाही

अनमोल देह दिला रे सदगुरू तुझे उपकार फिटणार नाही

कुणी निंदा वा कुणी वंदा

मला सदगुरूच्याच नामस्मरणाचाचं धंदा

जीबले गं जीबले गं तुझं काय काम

म्हण ना मुखाने सदगुरु नाम

रविवार माझ्या सवडीचा

सदगुरू माझ्या आवडीचा

जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं

सदगुरू तुझ्या नामाचं र याड लागलं

काय द्यावे सदगुरुशी

राहते निरंतर चरणापाशी

हीच माझी आस

जन्मोजन्मी व्हावा तुझा दास

माता पिता बंधू - सगेसोयरे सर्व जाणिजे वित्त

सदगुरू तूच सखा भगवंत

सदगुरू तुज वाचुनी मज नाही कोणी

मग सदगुरू येतो धाऊनी

माझ्या प्रेमाचे ते स्थळ

ते सदगुरूची केवळ

जाऊ सदगुरूच्या गावा

सदगुरु देईल विसावा

भेट होता सदगुरूशी

सुख वाटेशी जिवाशी

ध्यानी मनी सदगुरु राम रुपी रामदास

होऊनि सदगुरु चारणाचा दास

कोसळूनी पडिले जरी आकाश

तरी सोडणार नाही तुझ्या चरणाची आस

ये गं सदगुरु आई

माझ्या रेवादंड्याची माई

नामस्मरण करू सदगुरुचें

सार्थक होईल जन्माचे

देह जाओ अथवा राहो

सदगुरु चरणी दृढ राहो


०२

सदगुरु शिवाय


सद्गुरू शिवाय माझ्या जीवनाला काय अर्थ

सद्गुरू शिवाय जगणे म्हणजे कार्य व्यर्थ

सद्गुरूवर प्रेम करण्यात नाही माझा स्वार्थ

मोक्षाची प्राप्ती मिळवणं हीच माझी शर्त

सद्गुरू चरणावर अखंड राहणं हेच माझं कर्तव्य

सद्गुरू शिवाय माझ्यात नाही सामर्थ्य

सद्गुरू शिवाय पूर्ण नाही परमार्थ


०३

सदगुरु बैठक


आठवड्याची बैठक सद्गुरूची आज्ञा झाली एक

निष्ठेचा दास उपासना करतो चोख

आठवड्याची बैठक सांगावं आलं दोन

दासाला नाही मान अपमान

सदगुरुचं सांगावं आलं तीन उत्तम मंगलाचरण

सदगुरुचं सांगावं आलं चार दास आज्ञेत राहतो फार

सदगुरुचं सांगावं आलं पाच दास उपासना करतो पहाटेच

सदगुरुचं सांगावं आलं सहा दासांनी सोडला चहा

सदगुरुचं सांगावं आलं सात दास मिळून श्रवण करू एक साथ

सदगुरुचं सांगावं आलं आठ निष्ठेचा दास गेला श्रवणाला नीट

सदगुरुचं सांगावं आलं नऊ सद्गुरूचं चरण पाहू

सदगुरुचं सांगावं आलं दहा सद्गुरूची प्रचिती घेऊन पहा


०४

स्टोरी मीरर


स्टोरी मीरर च्या या स्पर्धेत

कविता करण्याचे हे दिवस

फिरून पुनः येणार नाहीत

विचार करा शिक्षक बंधूनो

आपण नंतर येथे असणार नाहीत

उद्या हा स्टोरी मीरर सोडून जाताना आठवण येईल स्पर्धेची ।।धृ।।

येणारे सप्ताहि येत राहतील

स्टोरी मीरर शिक्षक भाग घेत राहतील

तेव्हा तुम्ही नसणार मी ही नसणार

स्टोरी मीरर मात्र

उंच शिखर गाठणार ।।धृ।।

उज्ज्वल राहणार ।।धृ।।


०५

सदगुरु ओवी


पहाटेच्या पारी दारी सडा टाकते पाण्याचा

माझा शेजारी दास समर्थांचा

पाहटेच्या पारी रंगोळी काढते दारावरी

दासच्या घरी सदगुरु वास करी

पहटेच्या पारी दारी रांगोळी काढते अंगणी

पहटेची उपासना पोहचते सदगुरु चरणी

पहाटेच्या पारी मी उपासना कारात होते

दास नाना संग बोलत होता

आत गुरू शिष्याचा संवाद होता

पहाटेच्या पारी उपासना करते मी आसनावरी

दासच नाव सद्गुरूच्या वाहिवरी


०६

शाळेचा पाढा


शाळा एके शाळा । लवकर लवकर पळा

शाळा दुणे अभ्यास । बोलू आपण सवकाश

शाळा त्रिक कशी । ज्ञान वाढते दुपटीशी

शाळा चोक चांगली । मुले घडली आपली

शाळा पंचे शिक्षक । तेच आपले मार्गदर्शक

शाळा संग खेळणं । गडबडा लोळण

शाळा सते कॉफी । परीक्षेला माफी

शाळा अट्टे आमची । कोण म्हणतं तुमची

शाळा नव्वे घर । चांगल्याशी संगत धर

शाळा दाय सुटली । बुद्दी सारी वाढली।


Rate this content
Log in