STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

सेवा दीनदुबळ्यांची...

सेवा दीनदुबळ्यांची...

1 min
210

सेवा दीनदुबळ्यांची

करावी निःस्वार्थपणे

मग देव ही देतो 

त्याचे फळ अचूकपणे


न करावी त्याची हो

कधीच अवहेलना

ठेवावी मनात जागृत

नेहमी सद्भावना


नेहमीच घेणारे 

होण्यापेक्षा

कधी-कधी

देणारेही होऊन बघा


नका करू अती

प्राप्तीची ही अपेक्षा

अति तिथे माती

हीच कर्माची उपेक्षा


सेवा दीनदुबळ्यांची

करोनिया कमवा

आशीर्वाद अपार

कलयुगी हाची खरा उद्धार


माणुसकी ठेवावी 

नेहमी जपून

नातही जुळत 

मग आपसूक


कलयुगी देव भेटावा

तर मनी नेहमी 

दीनदुबळ्यांसाठी

प्रेम भाव असावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy