सौंदर्यवती
सौंदर्यवती
अधरावर लाल लाली डाळिंबी
चाफेकळी नाकी नथ सोन्याची
पदराने झाकशी तुझा मुखडा तरी
भासते मज तू खाण सौंदर्याची.
साज शृंगाराने नटली तू कमिनी
ओठांच्या पाखळ्या लाल रंगाच्या
मोत्यांची नथ सोन्याची ती नाकी
नजरेत भाव भासे साजण भेटीच्या.

