STORYMIRROR

Asha Patil

Inspirational

2  

Asha Patil

Inspirational

सावर रे मना

सावर रे मना

1 min
2.5K


सावर रे मना

आले जरी प्रसंग कठीण

होवो न मन लीन

झुको न कधी तन

सावर रे मना

जगरहाटी ही आगळी

नात्या परिस, परकी आपली

टोचती गिधाडासम मनास

सावर रे मना

आली वेळ जाईल

सरेल ही रात्र काळोखी

सरड्यासम बदलती नाती

सावर रे मना

अपेक्षा भंगाचे दु:ख

उपेक्षित नात्यांचे सुख

निर्णय कधी चुकतीलही

सावर रे मना

गेले दिन परतले

आप्तजन गोळा जाहले

स्वर्गच अवतरला भूवरी      

सावर रे मना


Rate this content
Log in

More marathi poem from Asha Patil

Similar marathi poem from Inspirational