STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

3  

Anupama TawarRokade

Inspirational

सावित्रीमाई

सावित्रीमाई

1 min
420

सावित्रीमाई...

तु रोवला स्त्रीशिक्षणाचा तुरा 

तूजला हा मानाचा मुजरा


झटलीस स्त्रीशिक्षणासाठी

भांडलीस विधवांच्या हक्कासाठी

लढलीस ज्योतीबांसवे दलीतांसाठी

झालीस दाता अनाथ अश्रितांसाठी


सावित्रीमाई...

जाणलीस गरज परंपरा स्वातंत्र्याची

झगडलीस मोडण्या परंपरा केशवपनाची

उभारली मालीका चळवळींची

रोवली मुळे स्त्रीविद्यादानाची


सावित्रीमाई ......

झेललेस कर्मठांचे छळ

जाहलीस ज्योतीबांचे बळ

जाणलीस विधवांच्या अत्याचाराची कळ

धुतलेस स्त्रीमनातील मळ 


सावित्रीमाई.....

पूर्णत्वाला नेलास ज्योतीबांचा ध्यास

जागविलीस स्त्रीशिक्षणाची आस

शिकविलास धडा जातीव्यवस्थेस

दिली आम्हा अस्तित्वाची आस


सावित्रीमाई...

तु रोवला स्त्रीशिक्षणाचा तुरा

तूजला हा मानाचा मुजरा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational