सावित्री
सावित्री
माय माझी गं सावित्री
लेकी बाळीची गं आई
स्त्री शिक्षणाची जननी
सावित्री आमुची माई..!!१!!
शेणा मातीचे गं गोळे
कीती झेलले अंगावर
स्त्री शिक्षणाचा ध्यास
घट्ट बांधीला निर्धार..!!२!!
दुःखीतांचे दुःख झेलण्या
वाघिण चवताळली
गुलामगिरीच्या बेड्यातून
चिमणी पांखरे मुक्त केली!!३!!
मुलींची शाळा काढूनी
स्त्रीयांचा उध्दार केला
आम्हां पाजूनी ज्ञानामृत
प्रकाश दिप लाविला....!!४!!
विधवा केशवपन रोखण्या
संप नाव्ह्याचा गं केला
विवाहानंतर शिक्षण घेवूनी
कर्मठांचा विरोध केला.!!५!!
बालविवाह ,बालहत्या
प्रतिबंधक कायदे केले
स्त्री समस्यांना जाणूनी
छत्र मायेचे उभारले.....!!६!!
