STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

साथ ही मैत्रीची (सहाक्षरी)

साथ ही मैत्रीची (सहाक्षरी)

1 min
370

धोतर सदरा 

खेटर पायात 

डोक्यावर टोपी

मफलर घेत


गर्द झाडी सारी

त्यातच ही वाट 

डोंगर दऱ्यात 

शोभतोय घाट


पायी चालताना 

आधार खांद्याचा 

सुख दुःख सारे 

वाटून घेण्याचा


किती दिवसाचे 

साथी रे आपण

अखेर प्रवास

सुखाचा करून


आयुष्यात असो

साथ ही मैत्रीची

शिदोरी सारीच

सोबत घ्यायची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational