सांभाळ आई स्वतःला
सांभाळ आई स्वतःला
लागले मी विव्हळू, निघाले तोंडून आई
कन्यारत्न विचारात पडले, म्हणे
तूच आई आणि कुणास हाक मारी.
काय चुकले तिचे, बरोबरच तर होते
आईने कधी, कण्हायचे नसते
हेच सर्व आई, कायम लपवत असते
कधीतरी असे पाहून, मुलांना आश्चर्य वाटते
आई सगळं आयुष्यभर, दुखणे अंगावर काढते
मला मेलीला काय होत, म्हणून मनाला समजावते
चुकते का हो तिचे, दुसऱ्यांचा विचार करते
राबून राबून बिचारी, दुखणे विसरून जाते
पण आई विचार कर, जर तूच अंथरूण धरशील
तू नसली तर तुझ्या, पोरांचे काय होईल?
सांभाळ स्वतःला, काम कमी कर
दुसऱ्यांसोबत कधीतरी, स्वतःचा विचार कर
शिळे अन्न खाणे, आता बंद कर
एक घास कमी पण, ताजे खाणे चालू कर
