STORYMIRROR

Vidya Patil

Inspirational

3  

Vidya Patil

Inspirational

आजची स्त्री

आजची स्त्री

6 mins
253

     धावपळीचे जगणे......धावपळीचे जगणे हा विषय आला की सर्वांना दिसते ते शहरातील जीवन..... म्हणजे धावाधाव करून बस, लोकल पकडणे...नोकरी धंदा करणे and all..... पण मला वाटतं त्यात काय एवढं विशेष.....


   खर धावपळीचे जीवन तर आयुष्यभर आपली आई.पत्नी, बहीण ,सून करते.....एक गृहिणी म्हणून म्हणा किंवा नोकरी , बिझीनेस करणारी स्त्री असू दे.....त्यांचं धावपळीचे जगणे कधी विचारात घेतले जाते का???? 


    मी एका बिझिनेस वुमन ची मुलाखत ऐकली होती... नाव नाही आठवत...पण तिने अन्नपूर्णा म्हणून restaurant सुरू केलेत....स्वतःच्या कष्टाच्या जोरावर.....दिसताना खूप वाटत किती मोठी असामी आहे...सुखी आहे...एवढी मोठी बिझिनेस वुमन ...काही दुःख नसेल....सुखाचे जीवन असेल तिचे....पण त्यासाठी तिने किती खस्ता खाल्ल्या असतील याची कोणी शहानिशा पण करत नाही.....


   ती स्त्री सांगत होती की, तिचा दिवस सकाळी चार वाजता रोज सुरू होतो आणि रात्री बारा वाजता संपतो.....यावेळेत ती आपल्या घरचे सर्व आटोपून स्वतः restaurant मध्ये जातीने लक्ष घालून सर्व व्यवहार सांभाळते.....त्यात तिने कुठेही घरची जबाबदारी पार पाडणे थांबवले नाही.....मुलांकडे लक्ष देणे असो किंवा नवऱ्याला वेळ देणे....फक्त चार तास झोपणे हे धावपळीचे नाही का हो?...


   तुम्ही म्हणाल पुरुष ही करतात ना हल्ली हे....नक्कीच करतात....hats off to them..... पण स्त्रीला अजुन एक जबाबदारी असते ती म्हणजे आपले कुटुंब....कुठेही जा....नोकरीतून निवृत्त व्ह्या पण स्त्री ल या जबाबदारीतून मुक्त होता येत नाही....ती मुक्त तेव्हाच होते जेव्हा ती या पृथ्वीवरून मुक्त होते...."सरणावर लाकडे गेली की माझी जबाबदारी संपली" ...अशा काही बायका म्हणताना दिसतात....भले त्या रागात बोलू दे...पण तिचेही धावपळीचे जीवन आहेच ना.....


   माझे पप्पा रिटायर्ड झाले....आणि त्या दिवशी घरी येऊन गाडीची चावी टेबलवर ठेवत म्हणले...

  " चला....झालो एकदाचे रिटायर्ड.... आता निवांत जगायचे"....

  .माझी आई लगेच म्हणाली.....

" मी कधी होणार हो रिटायर्ड?...मी कधी निवांत जगणार?..." तिच्या शब्दांनी आम्हा मुलांना भरून आले......


    खरच आहे हो...सगळ्यांचे धावपळीचे जगणे लक्षात येते पण तिचे? ... वर्षानुवर्षे ती सकाळी सुरू झालेली तिची कामाची गाडी दिवसभर सुरू असते.....रात्री अकरा बारा वाजता ती पाठ टेकते बेडवर.....ती पण टेकताना " आई आई ग...देवा...." असे शब्द ऐकायला मिळतात....का? दिवसभराच्या कामानंतर तिला झालेल्या वेदनांची जाणीव तिला झोपताना ...अंग बेडवर टाकताना जाणवते.....पण हे तिचे "आई आई " कुणाच्या कानापर्यंत पोचत नाही... कसे पोचेल हो?.... सगळे तेव्हा निर्धास्त, गाढ झोपेत असतात.....बिचारी कन्हत असते....विव्हळत असते....पण कुणाला त्याचे काहीच नसते....


    कुणाला कशाला तिच्या लेकीला पण नाही.....पण याच लेकीला जेव्हा लग्न झालं की हे सर्व करायला लागते तेव्हा तिला आईच्या वेदनांची तीव्रता जाणवू लागते...... यात मी सुद्धा आहे बर का.....मीही सर्व आता त्याच परिस्थितीतून जात आहे म्हणून मला समजते.....नाहीतर यापूर्वी मी पण निवांत जीवन जगत होते आईच्या जीवावर.....


    कोणतीही स्त्री ही स्वतःसाठी तर ही सगळी धावपळ नाही ना करत?.... सकाळचा नाश्ता, त्यात पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा.....चहा.... कॉफी, " आई पोह्यांवर खोबरे नाही टाकले?...कोथिंबीर संपली का घरातली?... दही आंबट कसे लागले ग."....किती ते नखरे??

      पुन्हा लंच....त्यात प्रत्येकाची वेगळी आवडती भाजी....दुपारचे जेवण कसं थाळी भरून हवं.... अहो त्याला काय काय करावं लागतं कधी पाहिलेत का किचनमधे जाऊन..? .....तरीही त्यात कुठे मीठ जास्त वाटत तर कधी कमी.....लगेच पळवली तिला " जा मीठ घेऊन ये."...लगेच पाणी...पाण्याचा तांब्या पण स्वतः घेत नाहीत काहीजण...अरे ती आपली मोलकरीण नाही हो....

      आणि जरी एखादी मोलकरीण असली घरी तरी तिलाही एक मान आहे का नाही...शुल्लक काम पण जर तिच्याकडून करून घेणं मग आपणाला हे हात पाय कशाला दिलेत देवाने?? नखं रंगवायला? मोबाईल पकडायला? गिळायला?


    सगळे काम करतात....पण तिचे काम ? काम नाही ते ....ते म्हणे कर्तव्य आहे.....सगळ्याच आई करतात नवीन काय त्यात?...अरे...आई करते म्हणून काय आपण काहीच करायचे नाही?....काही बहाद्दर असे आहेत की यांचे शूज 🧦 पासून सर्व जागेवर ठेवायचे म्हणे.... मग हे जॉब्ला जाणार म्हणे.....आणि निघताना आणि आईला ,बायकोला ,सुनेला पळवायचे...

     " ये जा...गाडीची चावी घेऊन ये....आत राहिली बघ..." गेली ती पळत पळत.....आणि 

    "तुम्हाला काय घरी बसून ? आम्हाला धावपळ करावी लागते...तेव्हा कुठे पैसा येतो घरी...." हा टोमणा आणि वर असतो.....

      अरे पण ती घरी आहे म्हणून तर तुम्ही सुखाने ,निर्धास्तपणे जाऊ शकता ना जॉब साठी......ती मुलांचं पाहते म्हणून तुम्ही उर्वरित धावपळ करू शकता ना.....का विसरता की तुमच्या त्या दहा ते सहा च्या धावपळीच्या जगण्यासाठी ती सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत धावपळ करत असते..... तेव्हा कुठे तुम्हाला डबा मिळतो.....इस्त्रीचे कपडे मिळतात.... शूज,बॅग, वॉलेट जाग्यावर मिळते....मोबाईल चार्ज करुन मिळतो सकाळी..... सकाळचा चहा सुद्धा तिचा तुम्ही गेल्यावर दहा नंतर होतो...पाण्याचा घोटही तिने सकाळपासूनच धावपळीत घेतलेला नसतो ....आणि तरीही आपण तिची धावपळ लक्षात घेत नाही.....

  

      सकाळी उठून मुलांचं डबा....त्यांची बॅग भरणे...मुलांचे खाणे....त्यांची अंघोळ, ब्रश सगळं करून बॅग आपल्या पाठीला लावून निघाली ही झाशीची राणी सकळसकली बसची वाट बघत.....एखादेवेळी पळत पळत बस पकडायची...नाहीतर स्वतः नेऊन बाईकवर सोडून यायचे....किती ती दगदग.....

     खेड्यात म्हणाल असे काही नसते पण तिथे वेगळेच असते हो.....चारल उठून भाकरी थापायाच्या....पोराची न्याहारी वेगळी डबा वेगळा...त्याच सगळं लवकर आवरून शेतात जायचं.....तिथलं आवरून पुन्हा जेवण नयायला यायचं आणि संध्याकाळी शेतातून यायचं घोटभर चहा घेतला की गुर ढोर बघायला जायचं....येताना दूध घेऊन जायचं रांगेत डेअरी मध्ये जाऊन उभी राहायचं....तिथून आले की पुन्हा स्वयंपाक....कुठे ही विश्रांती तिला....


     खेड्यातील असू दे की शहरातील गृहिणीची दगदग काही कमी नसते....आणि तिच्या serial बघण्यावर हसणारे पण आहेत ....का हो ? एका तासाच्या त्या नाटकाने तिची दिवसभराचा शिण जाणार असेल तर का नको बघायला तिने ती मालिका?..."आई कुठे काय करते" मलिका बघताना कित्येक स्त्रिया स्वतःला जगतात....त्यांना त्यात आपण दिसतो......डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.... का ?? कधी विचार केला की आपली आई त्या आईत स्वतःला बघते म्हणजे खरच काहीतरी चुकते आपले?....


    एक दिवस मला एक जण म्हणले "मॅडम खरी धावपळ तुमची होते हो...आमच्या बायका काय सुखाने झोपत असतात दुपारी...."....मला आश्चर्य असे काहीच वाटले नाही हो....कारण ही लोकांची mentality झाले की नोकरी करणाऱ्या बायका ग्रेट बाकीच्या घर सांभाळणाऱ्या गृहिणी बिनकामाचा गेट..

    .मी उत्तर दिले की " सर एक आठवडा तुम्ही आपले कर्तव्य exchange करा...मग बघा सुखाची झोप कुणाला मिळते ते.....एकवेळ ती दोन्ही करू शकेल पण तुम्ही नाही पार पाडू शकणार तिची जबाबदारी......ती आहे म्हणून घर स्वच्छ आहे....ती आहे म्हणून मुले शाळेत A grade मिळवू शकतात.....तिच्यामुळे घरात वस्तू जाग्यावर मिळते...घरातील आजारपण निघतात...हॉटेलचा खर्च वाचतो तिच्या हाताच्या चवीने मन आणि पोट तृप्त होत.""...

   नाहीतर या lockdown मध्ये कळलेच असेल आईची, गृहिणीची किंमत.....एक दोन महिने घरात नाही बसू शक्कलो आपण मग आपली गृहिणी काहींच्या भाषेत हाऊस वाइफ.....हा तीच हो.....कशी राहिली असेल हो वर्षानुवर्षे या घरातल्या कोठडीत एकटी बंद.? कधी बाहेरचे खाणे नाही का outing नाही...कसं जगत असेल हो ती एकटी घरात? विचार केला कधी? ....तिची धावपळ या lockdown मध्ये नक्कीच कळली असेल तुम्हाला.....


     या पुर्ण lockdown मध्ये सगळ्यांना आराम भेटला पण त्या गृहिणीचे काय??? तिची धावपळ,दगदग कुणाच्याच लक्षात नाही का आली?....नवनवीन पदार्थाची रेलचेल झाली घरात.... कुणी केली? .नवनवीन पदार्थाच्या स्टेटस् ल लाईक्स चा पाऊस पडला ना तुमच्या.... पण त्यामागे किती भांडी पडली सिंक मध्ये त्याचे pics कुणीच नाही send केले हो स्टेटस् म्हणून......ती कुणी घासली? की use and throw होती घरातील भांडी?..नाही ना....मग तिचे जीवन आहे की नाही खरे धावपळीचे?....


     एखादी स्त्री नटून थटून आपल्या कामावर निघाली की लगेच सगळ्यांच्या नजरा, तोंडाच्या घाणेरड्या शब्दांच्या बळी पडतात....काय तर दुसरं कामच काय? सारखं make up थपायचा आणि निघाली कामाला..... अरे पण ती आपली घरची जबाबदारी पूर्ण करून जाते ना कामाला? सकाळी किती वाजता उठव लगत असेल तिला? तुमच्या मते तिला तयार व्ह्यायाला वेळ लागतो पण ती सगळी घरची कामं आवरून बाहेर पडते...कुठलेही काम बाकी ठेवत नाही आपला छंद,आवड जोपासत असताना.....


   जरा तिची पण धावपळ लक्षात घ्या....नुसते नोकरी करणे म्हणजे धावाधाव,दगदग धावपळ नसते ...तर गृहिणीचे जीवन खरे धावपळीचे असते...


    ..सगळेच असे नाहीत हे मी मान्य करते....हल्लीची पिढी खरच मदत करते घरच्या गृहिणीला.....I really appreciate them..... पण ही "तुला काय काम असते....घरीच तर असते" असे गृहिणीला म्हणाऱ्या सर्वांना विनंती होती.......तिची धावपळ लक्षात घ्या....नका दुर्लक्षित करू तिची वेदना नाहीतर ती कायमची निघुन गेल्यावर तुम्हाला कळेल की घरची गृहिणी म्हणून काय धावपळ होते ती.....


   चला माझी पण धावपळ सुरू आता....माझी पाखरं पण उठली झोपून.....त्यांना पाहते....शेवटी मी पण एक गृहिणी आहे....नोकरी करत असले तरी माझी खरी आवडती जागा म्हणजे गृहिणी आहे.....जी मी आवडीने पूर्ण करते.....

   एका गृहिणी च्या तिच्या धावपळीच्या जगण्याला माझा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.....


    .....धन्यवाद


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational