तिरंगा
तिरंगा


तीन रंगांचा ध्वज आमचा
नाही कोणता भेदभाव असा
आपुलकीचा मान असा
राहील आकाशात उंच असा
राष्ट्रगीताच्या एकाच सुराने
गातात सगळे एकमुखाने
टाळ्यांच्या गडगडाने
फुले पडतात आनंदाने
देऊन सलामी तिरंगाला
आनंद होतो देशाला
स्पर्धा, कला, मनोरंजनाला
देतात प्रतिसाद कौशल्याला