STORYMIRROR

Bhagyashri Shelake

Inspirational

3  

Bhagyashri Shelake

Inspirational

कथा फाटक्या जिंदगीची

कथा फाटक्या जिंदगीची

1 min
252

काय, कशी अन् कुणाला सांगू?

माझ्या फाटक्या जिंदगीची चित्तरकथा


अनवाणी पायांनी, रखरखत्या उन्हात

जगण्याची जणू ही एक भयाणकथा


पोटचं लेकरू हे बांधलंय कमरेला,

विसावा नाही बघ शिणलेल्या जीवाला


सपासप रस्ता ह्यो कापत मी जाय

भुकेल्या पोराला उभ्याउभी पाजती माय


पैंजण खणखण, पायात वाजते 

डूल कानातले वाऱ्यासंगे नाचते


आधाराशिवाय कुणाच्या पुढे चालते

पाठीमागे माझी काळी सावली हालते


फाटक्या संसाराला ठिगळं लावत जाय,

खडतर रस्त्यावर काट्यात फसला पाय


हार नाही मी कधीच मानणार 

कष्ट करून लेकराला पोसणार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational