भूतके
भूतके
1 min
334
(भू-तलावरील केरवाले)
समाजात कचरा काढणार्याचा
नेहमीच होत असतो 'कचरा'
मनातील या घाण विचारांचा
कधी होईल 'निचरा'?
सफाईसाठी मॅनहोलमध्ये उतरणार्या
कामगारांचा गुदरमरतोय आत जीव
संवेदनशील माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल
कधी येईल कीव?
सफाई कामगारांच्या कपड्यांचा, अंगाचा
वास सुशिक्षितांच्या नाकास खुपतो
'माणूस' म्हणून जगताना माणुसकीचे
नाते तो कुठे जपतो?
रस्त्यावरील कचर्याचा ढीग पाहून लोक
नाकातोंडाला रूमाल लावून बोलतात
पोटासाठी काम करणार्या कामगारांसोबत
नाकाने अकलेचे कांदे सोलतात
पिढ्यानपिढ्या माणसाच्या मनातील
साचलेला 'कचरा' जाणार कसा?
बुद्ध, कबीर, गाडगेबाबांच्या
विचारांचा मोठा वारसा जसा
जिवंतपणी नरकयातना, मरणयातना भोगणार्या
भूतक्यांचा करू नका वेळोवेळी अपमान
त्यांच्याकडे 'माणूस' म्हणून पाहताना
योग्यवेळी करा त्यांचा सन्मान... सन्मान...