STORYMIRROR

santosh selukar

Inspirational

4.0  

santosh selukar

Inspirational

शिक्षक म्हणजे...

शिक्षक म्हणजे...

1 min
623


शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो

ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं

त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते

अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फुट चित्कारांना किंवा त्याच्याच रेषेखाली

अधांतरी लटकलेली असतात कित्येक भावनांच्या डोहात भिजून नतमस्तक झालेली

इवालाल्या चेहऱ्याची निरागस अक्षरे


शिक्षक नसतो कधीच बिचारा

तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा

त्याच्याच स्वामित्वाने महत्त्व येत असते शाळेला

तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ

नखशिखान्त अंधार भरलेल्या चिमुकल्या गोळ्यातून सूर्याचं तेज बाहेर काढणारा


तो समाज सुधारक क्रांती

कारकही तोच कित्येक चेतनांना पाठबळ असते त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे

शिक्षकाला जपावी लागतात कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड

आणि आकार द्यावा लागतो एका मुक्तपणे बागडणाऱ्या निराकार चैतन्याला...

कधी स्वतःला विसरून बागडावंही लागतं

जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत निर्ममपणे...


कधी अंधारही प्यावा लागतो बिनबोभाटपणे तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं

उद्दीष्टांच्या वाटेवर त्याच्या सोबतीला असतेच की खडूची धारदार तलवार अन् फळ्याची ढाल असते पाठीशी

विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल

अन् तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational