Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Dnyaneshwar Kajale

Inspirational


3  

Dnyaneshwar Kajale

Inspirational


माय

माय

1 min 200 1 min 200

ऊन सकाळी पडले 

नाते प्रभूशी जडले 

प्रेमात मी वाढले 

संस्कार ते घडले

आठवणीने अश्रू 

डोळ्यात आले 

आज पर्यंत त्याची सर नाय ...माझी माय ||१||

कष्टाची भाकरी 

नेहमीची चाकरी

आमच्यासाठी देवाला

 किती केले नवस 

आठवले ते दिवस 

शांत तु बसली नाही 

तुझा प्रेमाला अंत नाही 

आजपर्यंत त्याची सर नाही ...माझी माय ||२||

 अनवाणी प्रवास

 कष्टाचा सहवास 

लक्षात सदा माझे

 किती वाहिले ओझे 

हे प्रेमच नाही कोठे 

तुझ्यापेक्षा कोणीच नाही मोठे           

आजपर्यंत त्याची सर नाय... माझी माय ||३||

आठवण येता तुझी 

छाती धडधडते ग माझी

प्रेम तुझं मी पाहिलं

अख: आयुष्य तू वाहिलं 

आता नको मला साडी 

चोळी नको मला ओटी 

जन्म घेऊदे तुझ्याच पोटी              

आजपर्यंत तुझी सर नाय... माझी माय ||४||


Rate this content
Log in

More marathi poem from Dnyaneshwar Kajale

Similar marathi poem from Inspirational