STORYMIRROR

Dnyaneshwar Kajale

Others

3  

Dnyaneshwar Kajale

Others

बाप

बाप

1 min
249

रक्त थेंब थेंब आटवतो

 मुलांच्या शिक्षणासाठी

 जो मनिऑर्डर पाठवतो, 

क्षणाक्षणाला आठवतो 

तो बाप...

फाटक्या सदरात

 ,फाटक्या कूडत्यात ,

समाजामध्ये वावरतो,

मुलांना नवीन कपड्यात

 पाहतो तो बाप..

अपयशाने खचला 

प्रसंगात वाचला

गरिबीत एक मताने 

संसारात बसला

 तो बाप....

कधी हसला, तर 

कधी रडला

 परिस्थितीशी नडला 

तर पाप आहे,

लक्षात ठेव तो बाप...

मुलीचे लग्न, 

संसारातील वागणं 

मुलांचे शिक्षण, घराचे रक्षण 

करतो तो बाप...

स्वतः काही मागत नाही 

दिल्याशिवाय राहत नाही,

तुटकी चप्पल कष्टाची अक्कल 

आमच्यासाठी त्याच्या डोक्याला 

टक्कल तो बाप....

घामाच्या धारा 

मायेचा वारा आम्हाला घालतो 

कष्टाचा चारा,

नशिबी त्याच्या 

सदा काळजी काळजात

 त्याच्या मायेचा झरा तो बाप....


Rate this content
Log in

More marathi poem from Dnyaneshwar Kajale