"माझे कुटुंब माझे जबाबदारी"
"माझे कुटुंब माझे जबाबदारी"


एक विषाणू पृथ्वीवर, गड्यांनो, आला लई बेकार..!
पसरला तो जगभरात, देतोय त्रास, जसा रजाकार..!
नाव त्याचे कोरोना, केले त्याने सर्वांना बेजार..!
उजाड झाली शहरे, मोडले त्याने कैक संसार..!
टाळेबंदी केली सरकारने, कहर वाढण्या अगोदर..!
पण काही तिरसट डोक्यांनी, केले मातीमोल बरोबर..!
ना मास्क, ना स्वच्छ हात, ना ठेवले सुरक्षित अंतर..!
त्यामुळेच वाढला देशभर, कोरोना संसर्ग भयंकर..!
संसर्ग जरी वाढला, त्यास शासन नाही हो जवाबदार..!
पाळले नाही नियम तुम्ही, वागलात लई बेजवाबदार..!
वरून पुन्हा सरकारला, दोष द्यायला तुम्हीच हो तयार..!
म्हणतात, टाळेबंदी केल्यामुळेच, नाही अन्न-रोजगार..!
त्रासला असाल आपण जरा, पण थकले नाही सरकार..!
अहोरात्र झटत आहेत, डॉक्टर-नर्स अन् सफाई कामगार..!
बंदोबस्तात थकले पोलीस कर्मचारी, झालेहो ते बेजार..!
साथ तुम्ही ही द्या थोडी, अजुन रहा घरात, दिवस चार..!
संपला जरी लॉक डाऊन, होतोय अनलॉक जरा जरा..!
पाळा नियम तुम्हीही, आता, इतरांनाही शिकवा जरा..!
लावा तोंडाला मास्क आणि ठेवा तुम्ही आपसात अंतर..!
हात स्वच्छ ठेवा नेहमी, सांगा 'सरळ शब्दांत' सर्वांना हेच निरंतर..!
'माझे कुटुंब माझे जबाबदारी', आता करा तुम्ही अंगीकार..!
सगळे मिळून करूया आपण, त्या कोरोनाला तडीपार..!