STORYMIRROR

sunanda tarle

Inspirational

3  

sunanda tarle

Inspirational

ऋतु बदलती

ऋतु बदलती

1 min
254

ऋतु बदलती ,

धरतीवर रंग बहरती.

ऋतूच्या या खेळात,

आम्ही न्हाऊन निघती.


कधी हिरवा शालू,

तर कधी पिवळा.

तर कधी तपकिरी, 

तर असती कधी सोनेरी.


कधी, बाल्य म्हणूनी अवखळती,

कधी किशोरी, तारुण्य बहरती.

तर कधी, वृद्ध होऊनी, 

पिकले पान गळून पडती.


निसर्गाचे हे रंग मजेमजेचे,

वसुंधरेवर हे बागडती.

वा! रे ,किमया ही निसर्गाची ,

मानव कधी जाणती. 


ऊन सावली खेळाचा,

ऋतु हा लपंडावाचा.

देवाची अशी ही निती,

पृथ्वीची ही दैनिक गती. 


नको रे विनाश हा मानवा,

डोळे उघडूनी पहा.

निसर्गाचे हे देणे,

तू ही देत रहा. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational