STORYMIRROR

sunanda tarle

Inspirational

3  

sunanda tarle

Inspirational

कथा पर्यावरणाची

कथा पर्यावरणाची

1 min
656

दोस्तांनो या, ऐका ऐका, कथा पर्यावरणाची,

कितीही मोठे झालो तरी ,कधीही नाही विसरायची! 


तुका म्हणे, झाडे वेली अमुचे सगेसोयरे. 

असती आपले मित्र,त्यांच्याशी दोस्ती करायची!

एक सुकलेले झाड तोडी, तेंव्हा पाच झाडे लावायची !

मायेने ती वाढवायची, उगाच नाही तोडायची !

सर्वांनी झाडे लावायची, निगा त्यांची राखायची


पाणी आपुले जीवन असती .

सदा स्वच्छ ते ठेवायचे!

गाळून, उकळून पाणी प्यायचे

लागेल तितकेच घ्यायचे,उगाच ना फेकायचे!

नद्या आपल्या लोकमाता,असती जलवाहिन्या 

निर्माल्य,व घाण टाकून ,अस्वच्छ नाही करायच्या


वाहनांचा धूर मोठा घोर, हवा शुद्ध राखायची,

कारखान्यांतील रसायने, दूषित पाणी ,नदीत नाही सोडायचे!

वाहनांचा, टी.व्ही,टेपरेकाॅर्डरचा मोठा आवाज नाही करायचा

इथे, तिथे ,कचरा नाही करायचा, आरोग्य चांगले ठेवायचे!

अति मोबाईल चा वापर, करु नका जागर

डोळे आणि कान ,ठेवा त्यांचा मान, चांगलेच ते पहायचे!


प्लॅस्टिकने घातला जगाला विळखा,

धोका त्याचा सर्वांनी ओळखा.

विषाचा धूर आणि नदीला पूर,

वापर त्याचा टाळायचा, निर्धार हा करायचा!

कापडी पिशव्या वापरा हो, पर्यावरणाचा ह्मस टाळा हो!


ऐका ऐका ही कथा पर्यावरणाची,

 फक्त ऐकून नाही सोडायची,

आचरणात ती आणायची!

निसर्गाशी धरुनी नाते,

जीवन सफल करायचे

हो हो हो हो हो! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational