STORYMIRROR

विवेक द. जोशी

Romance

3  

विवेक द. जोशी

Romance

रंग

रंग

1 min
187

यौवनाने लाविली गाली

लाली लाल लाल

भांगत गं तुझ्या 

आठवणींचा गुलाल ...।


थरारला देह गोरा गोरा

अन् हात सुंदर हाती

 प्रेमाची रंग फुले

 गीत तुझे गाती 

 अशी यौवनाने केली कमाल ...।।१।।


रंग सप्तरंग फुलले

तुझ्या तना मनावर 

आता हे रंग कसे 

टाकू तुझ्या अंगावर

अशी रंगांनी केली धमाल।। २।।


जरी तू रुसली लाजली सखे 

खेळणार आज मी प्रेमरंग

प्रेम रंगी मन रंगे

रंगे गोरे गोरे अंग 

माझ्या रंगांनी झाली तू लाली लाल ।।३।।


होती हाती पिचकारी

रंगांनी भरलेली

लाल हिरव्या निळ्या रंगांनी

काया ही रंगलेली

असे रंगीत झाले तुझे गोरे गोरे गाल ...।।४।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance