रमाई
रमाई
महासुर्याची सावली
रंजल्या गांजल्यांची आई
करुणेचा महासागर, मातृत्वाचे महाकाव्य
अशी हि माझी माता रमाई...
जीवनात कित्येक संकट आली
तरी तिने हिम्मत नाही सोडली
गोवऱ्या थापून, चटणी भाकर खाऊन
संपूर्ण आयुष्य समाधान मानत राहिली...
अवजड ओझ्याखाली आयुष्य दबले
गुंजावर भ्रमरांचा अंतर राहिला
शोधात सुखाच्या आयुष्य सरले
डोळ्यात आसवांचा अंधार दाटला...
उजळती दुषेने ओंजळीत जहरी
जलाशय हा प्रेमाचा तुडुंब भरला
मार्गात जखमांच्या सुरपारंब्या आल्या
स्वप्नातील जिव्हाळा स्वप्नातच राहिला...
भिमराया शेवटच्या श्वासापर्यंत
ती तुम्हा साथ देत राहिली
भिमराया तुझी झाली जगात कीर्ती
पण रमाई माऊली पडद्यामागेच राहिली...
जगी रमाईची गाथा
होती दिन-दलितांची ती माई
दुःख, त्याग, कारुण्य व प्रेरणास्थान
म्हणजेच माझी माता रमाई...