स्वप्नातली वाट
स्वप्नातली वाट


थंडगार या कातरवेळी
आठवण तुझी येता
मन आतुर तुला भेटण्या
वाऱ्याची चाहूल होता
पाण्याच्या स्पर्शात तूच यावे
इंद्रधनूच्या रंगात तूच यावे
क्षितिजाकडे पाहता जणू
त्यातही तुझीच प्रतिमा दिसे
समजावू किती मनाला की
या मृगजाळ्यातून बाहेर पळ
स्वप्नातील परीचा ध्यास सोडून
एका चांगल्या वाटेवर वळ
स्वप्नाच्या या वाटेवरून
तुझ्यापासून दूर जाता
मन मात्र तयार नाही
रुसवा धरून बसला होता