STORYMIRROR

Varsha Chopdar

Romance

3  

Varsha Chopdar

Romance

रिमझिम रिमझिम पाऊस धारा

रिमझिम रिमझिम पाऊस धारा

1 min
4.7K

रिमझिम रिमझिम पाऊस धारा, मस्त बरसती

गंध मातीचा दरवळ सारा, मस्त हवा ही

अंगणी माझ्या, बरसती जलधारा

चिंब भिजलेला, हा आसमंत सारा

ये ना प्रिया, ये ना प्रिया


सरी बरसती, रस्त्यांवरती, इंद्रधनु आकाशी

पाऊस चकवुनी छत्रीत घेण्या, पाऊस जाण्याआधी

कोमजलेला मोगरा, बघ कसा फुलला

सांज कुंद ही, झेलण्या या नभधारा

ये ना प्रिया, ये ना प्रिया


भान हरपुनी चिंब भिजू या, ओल्या अंगणी

चिंब अंग ऊबदार मिठी, गीत ओठावरती

भेदीत जलधारा, बनुनी भिरभिरता पारवा

बेभान वाऱ्यापरी, बेधुंद होऊन ये ना

ये ना प्रिया, ये ना प्रिया



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance