रातराणी
रातराणी
फुलली रातराणी जशी
रातीची चाहूल झाली
होऊन बेभान नजर
तुला रे शोधत राही.....
अलवार तुझी चाहूल
उन्मत प्रेमाचा रंग गाली
वळवाच्या पावसाला जग आली
बरसण्यात सारी रात गेली...
तापलेली धरणी पुन्हा
कवेत मुरून गेली
झोकून स्वतःला
अंकुरत रुजून गेली.....
नाही माहित प्रेमाचा
अर्थ असे काही
जिथे राधा तिथे शाम राही
हृदय जिथे साद घाली
तिथे प्रेमाचा गाव होई....
मनाच्या संवादाला
प्रतिसादाची दाद आली
फुलते रातराणी जशी
रातीची चाहूल झाली....

